नवी दिल्ली: रिझर्व्ह बँकेच्या तपास अहवालात ताशेरे, चंदा कोचर यांच्या अडचणी वाढल्या
Continues below advertisement
आयसीआयसीआयकडून व्हिडीओकॉनला देण्यात आलेल्या कर्जाप्रकरणी बँकेच्या सीईओ चंदा कोचर यांच्या अडचणीत आता भर पडताना दिसत आहेत. कारण रिझर्व्ह बँकेने याबाबत एक तपास अहवाल तयार केला आहे. यामध्ये सरळ सरळपणे चंदा कोचर आणि त्यांच्या पतीच्या कारभारावर ताशेरे ओढण्यात आले आहे. दीपक कोचर हे चंदा कोचर यांचे पती आहे, ही माहिती बँकेपासून लपवण्यात आली. 2015 मध्ये बँकेला दिलेल्या दस्तऐवजात दीपक कोचर यांना फक्त जवळाचा नातेवाईक असल्याचं दाखवण्यात आलं होत. बँकेकडून ही माहिती लपवण्यात आल्याचं या अहवालात म्हणण्यात आलं आहे. त्यामुळं आता चंदा कोचर यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.
Continues below advertisement