मनसेच्या 6 नगरसेवकांसोबत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंची पत्रकार परिषद
Continues below advertisement
‘मुंबई महापालिकेत लवकरच आमचा महापौर बसवू’ अशी बतावणी करणाऱ्या भाजपला शिवसेनेनं एक जोरदार धक्का दिला आहे. मुंबई महापालिकेतील मनसेचे सातपैकी सहा नगरसेवक हे शिवसेनेसोबत जाणार आहेत.
हे सहाही नगरसेवक कोकण आयुक्त कार्यालयाकडे रवाना झाले असून ते आता वेगळ्या गटाची नोंदणी करणार आहेत. त्यामुळे शिवसेनेचं महापालिकेतील संख्याबळही वाढणार आहे. शिवसेनेच्या या खेळीनं एकाच वेळी भाजप आणि मनसेला जबरदस्त धक्का बसला आहे.
Continues below advertisement