EXCLUSIVE सातारा: मी खलनायक असेन तर उदयनराजे प्रेम चोप्रा: शिवेंद्रराजे भोसले
Continues below advertisement
“टीका करायला मुद्दे नसले की लोक वैयक्तिक पातळीवर येतात. ते मला खलनायक बोलले, ठिक आहे. मला खलनायकाची भूमिका घ्यायला का लागली? तुमचं राजकारण हे प्रेम चोप्रासारखं आहे. शेवटी प्रेम चोप्राला उत्तर द्यायला पाहिजे. मी अमोल पालेकरांची भूमिका घेऊ शकत नाही”, असा पलटवार साताऱ्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार शिवेंद्रराजे भोसले यांनी खासदार उदयनराजे भोसले यांच्यावर केला. ते एबीपी माझाशी बोलत होते.
उदयनराजे भोसले यांनी नुकतंच पत्रकार परिषद घेऊन, शिवेंद्रराजे भोसले यांच्यावर तुफान टीका केली होती. त्याला शिवेंद्रराजेंनी उत्तर दिलं.
Continues below advertisement