मुंबई : राज्यातल्या मंत्र्यांना सरकारकडून अतिरिक्त गाड्यांची खैरात
Continues below advertisement
राज्यातल्या मंत्र्यांना राज्य सरकारकडून अतिरिक्त गाड्यांची खैरात होत असल्याचा आरोप माहिती अधिकार कार्यकर्ते अनिल गलगली यांनी केला आहे. माहितीच्या अधिकारात मागवलेल्या माहितीनुसार यात राज्याचे कृषिमंत्री पांडुरंग फुडकर, राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्यासह विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील यांचाही समावेश आहे. मंत्र्यांना कामकाजासाठी नियमानुसार प्रत्येकी एक वाहन दिले जाते. पण फुंडकर दोन तर सदाभाऊ खोत एक अतिरिक्त वाहन वापरत असल्याचं उघड झालं आहे. इतकंच नाही. तर मंत्र्यांचे स्वीय सचिव आणि कृषि खात्याच्या प्रधान सचिवांनाही हा लाभ मिळत असल्याचा दावा गलगली यांनी केला आहे.
Continues below advertisement