स्पेशल रिपोर्ट : मुंबई : सातव्या वेतन आयोगाप्रमाणे पेन्शन द्या, माजी आमदारांची मागणी

Continues below advertisement
राज्य सरकारच्या तिजोरीत खडखडाट आहे. राज्यावर कर्जाचा बोजा आहे. कर्मचाऱ्यांचे पगार भागवताना सरकारच्या नाकी नऊ येत आहे. राज्याची परिस्थिती अशी असताना, माजी आमदारांनी पेन्शनवाढीसाठी डोकं वर काढलं आहे.

माजी आमदारांना पेन्शन वाढवून हवी आहे. ही वाढ थोडी थोडकी नको तर सातव्या वेतन आयोगाप्रमाणे हवी आहे.

माजी आमदारांना सध्या महिन्याला 50 हजार रुपये पेन्शन मिळते. त्यामध्ये वाढ करण्याची मागणी, माजी आमदारांनी केली आहे. या मागणीसाठी माजी आमदारांनी मुख्यमंत्री, विधानसभा अध्यक्ष आणि विधानपरिषदेच्या सभापतींची भेट घेतली.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram