मुंबई : तीन वर्षांपूर्वीच्या फ्रोझन बीजातून ब्यूटीक्वीन डायना हेडन प्रेग्नंट
तीन वर्षांपूर्वी जतन केलेल्या बीजाच्या माध्यमातून (फ्रोझन एग्ज) माजी मिस इंडिया डायना हेडन दुसऱ्यांदा गर्भवती राहिली आहे. 44 वर्षीय डायना यावेळी ट्विन्सना जन्म देणार आहे. जानेवारी 2016 मध्येही तिने फ्रोझन एग्ज पद्धतीनेच पहिल्या बाळाला जन्म दिला होता. त्यावेळी, आठ वर्षांपूर्वी जतन केलेल्या बीजातून तिला अपत्यप्राप्ती झाली होती.