हृतिक-सुझान पुन्हा एकदा लग्नाची गाठ बांधणार?
अभिनेता हृतिक रोशन आणि सुझान खान हे कोणे एके काळी बॉलिवूडमधील सर्वात हॅपनिंग कपल मानलं जात असे. 13 वर्षांच्या संसारानंतर दोघांनी काडीमोड घेतला आणि बॉलिवूडपासून सर्वसामान्य चाहत्यांपर्यंत सर्वच हळहळले. हृतिक आणि सुझान हे दोघं पुन्हा विवाहबंधनात अडकणार असल्याची चर्चा आहे.