Independence Day | स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला माऊंट एलब्रुसच्या बेसकॅम्पवर तिंरगा | ABP Majha
Continues below advertisement
15 ऑगस्टच्या पूर्वसंधेला युरोपच्या सर्वोच्च शिखराच्या बेसकॅम्पवर ७३ फुटी तिरंगा फडकलाय. एव्हरेस्टवीर आनंद बनसोडेंसोबत सह्याद्रीच्या मावळ्यांनी हा अनोखा विश्वविक्रम केलाय. देशाच्या स्वातंत्र्यदिनानिमित्त माऊंट एलब्रुसच्या बेसकॅम्पवर ७३ फुटांचा तिंरगा फडकावलाय. शिखराच्या बेसकॅम्पवर खास कोल्हापुरी फेटा बांधून या टीमने तिरंग्याला अभिवान केलं. या टीममध्ये १० वर्षांचा साई कवडे, तुषार पवार, भूषण वेताळ , सागर नलावडे, आनंद बनसोडे यांचा समावेश आहे.
" थ्री सिक्स्टी एक्सप्लोरर" मार्फत 15 ऑगस्ट रोजी युरोपातील सर्वोच्च शिखरावर तिरंगा फडकवण्याची मोहीम आयोजित केली गेली होती. या मोहीमेतली खास बाब म्हणजे साई कवडे हा एलब्रुस शिखर सर करणारा आशियातला सर्वात लहान गिर्यारोहक ठरलाय.