नवी दिल्ली : सलग 30 दिवस बेरोजगार असल्यास 75 टक्के पीएफ काढता येणार!
Continues below advertisement
कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना अर्थात ईपीएफओचे सदस्य आता एक महिन्यापर्यंत बेरोजगार असल्यास खात्यातून 75 टक्के रक्कम काढू शकतात. याशिवाय त्यांना आपलं खातंही कायम ठेवता येईल.
केंद्रीय कामगारमंत्री संतोष गंगवार यांनी ईपीएफओच्या विश्वस्तांची बैठक झाल्यानंतर ही माहिती दिली. गंगवार ईपीएफओच्या विश्वस्तांच्या केंद्रीय बोर्डाचे चेअरमनही आहेत.
या योजनेत बदल करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याअंतर्गत सलग एक महिन्यापर्यंत बेरोजगार असल्यास ईपीएफओचा कोणताही सदस्य 75 टक्क्यांपर्यंत रक्कम खात्यातून काढू शकतो आणि खातं कायम चालू ठेवू शकतो, अशी माहिती संतोष गंगवार यांनी दिली.