Vishnudas Bhave Puraskar 2022 : नाट्यक्षेत्रातील मानाचा विष्णुदास भावे पुरस्कार सतीश आळेकरांना जाहीर
यावर्षीचा विष्णुदास भावे गौरव पदक पुरस्कार नाटककार सतीश आळेकर यांना देण्यात येणार आहे. मराठी रंगभूमीवर मानाचा समजल्या जाणाऱ्या या पुरस्काराची सांगलीत घोषणा करण्यात आली. ५ नोव्हेंबर रोजी ज्येष्ठ दिग्दर्शक जब्बार पटेल यांच्या हस्ते या पुरस्कारांचं वितरण होणार आहे. गौरव पदक, रोख रक्कम, स्मृतीचिन्ह असं या पुरस्काराचं स्वरुप आहे. यंदाचं पुरस्काराचं हे ५५ वं वर्ष आहे.