Vikram Gokhale Health Update : ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांची प्रकृती गंभीर, पुण्यात उपचार सुरु
Vikram Gokhale: ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले (Vikram Gokhale) यांची प्रकृती सध्या गंभीर आहे. विक्रम गोखले यांच्यावर पुण्यातील (Pune) दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात (Deenanath Mangeshkar Hospital) गेल्या 15 दिवसांपासून उपचार सुरु आहेत. पण सध्या त्यांची प्रकृती खालावली आहे, अशी माहिती मिळत आहे.
विक्रम गोखले यांनी विविध नाटक, मालिका आणि चित्रपटांमध्ये काम केले. त्यांच्या अभिनयाला प्रेक्षकांची पसंती मिळाली आहे. एबीपी माझाच्या सिंहासन या कार्यक्रमाचे विक्रम गोखले यांनी सूत्रसंचालन केले होते.
काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झालेल्या गोदावरी या चित्रपटामध्ये देखील विक्रम गोखले यांनी महत्वाची भूमिका साकारली. या चित्रपटामध्ये विक्रम जोशी यांच्याबरोबरच जितेंद्र जोशी, अभिनेत्री गौरी नलावडे, अभिनेता संजय मोन यांनी देखील प्रमुख भूमिका साकारली आहे. अनेकांनी या चित्रपटाच्या कथानकाचे आणि चित्रपटातील कालाकारांच्या अभिनयाचे कौतुक केले. तसेच 'तुझेच मी गीत गात आहे' या मालिकेत देखील त्यांनी एन्ट्री केली होती. अनेक वर्षांच्या ब्रेकनंतर त्यांनी या मालिकेमध्ये काम केले. या मालिकेत त्यांनी पंडीत मुकुल नारायण नारायण ही भूमिका साकारली.