Katrina Kaif-Vicky Kaushal wedding : विकी कौशल आणि कतरिना कैफ यांचा शाही थाटात विवाह सोहळा
अभिनेता विकी कौशल आणि अभिनेत्री कतरिना कैफ यांचा शाही थाटात विवाह सोहळा पार पडतोय... राजस्थानच्या सवाई माधोपूरमधील बारवरा किल्ल्यातल्या द सिक्स सेन्सेस रिसॉर्ट इथे हा शाही लगीन सोहळा होतोय. या लग्नसोहळ्यातील फोटोंचे राईट्स एका आंतरराष्ट्रीय कंपनीला विकण्यात आलेत. त्यामुळे इथे लग्नसोहळ्यातील कुठलीही माहिती बाहेर लीक होऊ नये यासाठी प्रचंड गोपनीयता जपली जातेय. या लग्नासाठी वऱ्हाडी बनून आलेल्या पाहुण्यांसाठी मात्र हा सोहळा काहीशी शिक्षा ठरतोय. तर तिकडे गेस्टलिस्टमधल्या दोन बड्या खानची मात्र या लग्नसोहळ्याला गैरहजेरी असेल. सलमाननंतर आता किंग खान शाहरुखही कतरिनाच्या लग्नसोहळ्याला जाणार नसल्याचं कळतंय.
Tags :
Rajasthan Actor Actress अभिनेत्री राजस्थान अभिनेता Wedding Ceremony Vicky Kaushal अभिनेत्री विकी कौशल Katrina Kaif The Six Senses Resort