राज्यात नाट्यगृह सुरू करण्यास राज्य सरकारची परवानगी, 50 टक्क्यांच्या उपस्थितीत सुरू होणार नाट्यगृह

Continues below advertisement

मुंबई : गेल्या कित्येक महिन्यांपासून वाट पाहणाऱ्या नाट्यकर्मींसाठी आनंदाची बातमी आहे. आता लवकरच नाट्यगृहांमध्ये तिसरी घंटा वाजणार आहे. अखिल भारतीय नाट्य परिषदच्या सदस्यांनी आज (शुक्रवार 3 सप्टेंबर) मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत नाट्यगृह सुरू करण्यासाठी भेट घेतली. यावेळी मुख्यमंत्र्यांनी राज्यातील नाट्यगृहे 5 नोव्हेंबरपासून 50 टक्के क्षमतेनं सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे.

या चर्चेसाठी अखिल भारतीय नाट्य परिषद अध्यक्ष नवनाथ मच्छिंद्र कांबळी, प्रवक्ते मंगेश कदम, मराठी नाट्यव्यासायिक निर्माता संघ अध्यक्ष संतोष भरत काणेकर, रंगमंच कामगार संघटना अध्यक्ष किशोर वेल्ले, विजय केंकरे, रंगकर्मी आंदोलन प्रतिनिधी उपस्थित होते. रंगकर्मी आंदोलन प्रतिनिधी विजय राणे यांनी आणि ही भेट घडवून आणण्यासाठी पुढाकार घेणारे आदेश बांदेकर, सुबोध भावे या सगळ्यांच्या उपस्थितीत नाट्यगृह सुरु करण्याचा महत्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. नाट्यगृह 50% प्रेक्षक उपस्थितीमध्ये 5 नोव्हेंबर 2021 पासून सुरू करण्याचे आदेश संबंधित सगळ्या शासकीय अधिकारी आणि विभागांना ताबडतोब देण्यात आले आहे.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram