Ratnakar Matkari | ज्येष्ठ रंगकर्मी रत्नाकर मतकरी यांचं निधन,अभिनेते अरुण नलवडे यांची प्रतिक्रिया
ज्येष्ठ रंगकर्मी आणि साहित्यिक रत्नाकर मतकरी यांचं रविवारी रात्री (17 मे) निधन झालं. वयाच्या 81 व्या वर्षी मुंबईत त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनामुळे नाट्य आणि साहित्य सृष्टीवर शोककळा पसरली असून बहुआयामी व्यक्तिमत्त्व हरपल्याची भावना व्यक्त होत आहे.