Subodh Bhave | अभिनेता सुबोध भावेचा ट्विटरला रामराम! सोशल मीडियावरील वाढत्या नकारात्मकतेमुळे निर्णय
Continues below advertisement
ट्विटरवर एक पोस्ट टाकून सुबोधने आपल्या भावनांना वाट करून दिली. या पोस्टमध्ये कुणाचाही राग नव्हता ना निषेध. केवळ या पोस्टमध्ये आपण ट्विटरला रामराम ठोकत असल्याचं त्यानं अत्यंत नम्रपणे सांगितलं. आपल्या सर्वांचं प्रेम आणि आशीर्वाद मिळाले त्याबद्दल धन्यवाद. मी माझं ट्विटर अकाऊंट डीलीट करतो आहे. काळजी घ्या अशाा आशयाची पोस्ट सुबोधने दुपारी टाकली आणि त्याच्या चाहत्यांच्या मनात प्रश्नचिन्ह उभं राहिलं.
Continues below advertisement