Narendra Bhide | सुप्रसिद्ध संगीतकार नरेंद्र भिडे याचं हृदयविकाराच्या धक्क्याने दुखःद निधन

Continues below advertisement

सुप्रसिद्ध संगीतकार नरेंद्र भिडे ह्यांचे आज पहाटे हृदयविकाराच्या धक्क्याने दुखःद निधन झाले आहे. ते 47 वर्षांचे होते. अंत्यदर्शन सकाळी 9.30 वाजता डॉन स्टुडिओ, कर्वे नगर पुणे  इथे तर सकाळी 11 वाजता वैकुंठ येथे अंत्यसंस्कार होणार आहेत. भिडे यांच्या पश्चात आई वडील पत्नी आणि दोन मुले आहेत.

सिव्हिल इंजिनियरची पदवी घेतलेल्या संगीतकार नरेंद्र भिडे यांनी अनेक नाटक, मालिका, मराठी चित्रपट संगीतबद्ध केले आहेत. त्यांनी भारतीय शास्त्रीय संगीताचे शिक्षण उस्ताद महंमद हुसेन खान साहेब, स्वरराज छोटा गंधर्व, बाळासाहेब मते, शैला दातार, सुधीर दातार, सुहास दातार यांच्याकडे तर पाश्चिमात्य संगीताचे शिक्षण हेमंत गोडबोले यांच्याकडे घेतले.

भारतीय शास्त्रीय संगीताचे शिक्षण उस्ताद महंमद हुसेन खान साहेब, स्वरराज छोटा गंधर्व, बाळासाहेब मते, शैला दातार, सुधीर दातार, सुहास दातार यांच्याकडे तर पाश्चिमात्य संगीताचे शिक्षण हेमंत गोडबोले यांच्याकडे घेतले. त्यांनी अनेक नाटक, मालिका, चित्रपट, जिंगल्स च्या माध्यमातून संगीतक्षेत्रात आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली होती. त्यांना झी गौरव (पाच वेळा), सह्याद्री सिने अवॉर्ड,  राज्य नाट्य पुरस्कार ( दोन वेळा), व्ही शांताराम पुरस्कार, श्रीकांत ठाकरे पुरस्कार, म. टा. सन्मान, राज्य चित्रपट पुरस्कार आदि विविध पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram