Drugs Case | ड्रग्ज प्रकरणी कॉमेडियन भारती सिंह आणि नवरा हर्ष लिम्बाचिया यांना जामीन मंजूर

Continues below advertisement

कॉमेडियन भारती सिंह आणि तिचा नवरा हर्ष लिम्बाचिया यांना जामीन मंजूर झाला आहे. 15 हजार रुपयांच्या वैयक्तिक जातमुचलक्यावर मुंबई महानगर दंडाधिकारी न्यायालयाने दोघांना जामीन मंजूर केला. घरात ड्रग्ज सापडल्याप्रकरणी दोघांना एनसीबीने अटक केली होती.

या दोघांकडे सापडलेला गांजा हा कमी प्रमाणात होता. तो वैयक्तिक सेवनासाठी होता. त्याचा व्यावसायिक वापर केला नव्हता, अशा आशयाचं निरीक्षण कालच कोर्टाने नोंदवलं होतं. शिवाय हर्षची एनसीबी कोठडी नाकारत दोघांचीही रवानगी न्यायालयीन कोठडीत केली होती. हा जामीन अर्ज कालच कोर्टापुढे सादर करण्यात आला होता. पण एक दिवसाचा अवधी तपास यंत्रणांना यावर उत्तर देण्यासाठी देण्यात आला होता. परंतु सरकारी वकील काही कारणांमुळे कोर्टात हजर राहू शकले नाहीत. त्यामुळे अखेर कोर्टाने या दोघांची १५ हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर करुन त्यांना एनसीबीला यापुढील तपासात सहकार्य करण्याचे निर्देश दिले आहेत.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram