Jaan Kumar Sanu | मराठी भाषेची चीड येणाऱ्या जान कुमार सानूला लवकरच थोबडवणार, मनसेची धमकी
कलर्स वाहिनीवर सुरु असलेल्या बिग बॉस रिअॅलिटी शोमध्ये प्रसिद्ध गायक कुमार सानूचा मुलगा जानकुमार सानूनं मराठी भाषेबद्दल मानहानीकारक वक्तव्य केल्यानं संताप व्यक्त केला जात आहे. मराठी भाषेची याला चीड येते, अशा संदर्भातलं वक्तव्य जान कुमार सानूनं केलं आहे. यावर मनसेनं त्याला चांगलाच इशारा दिला आहे.
मनसे चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर यांनी ट्वीट करत म्हटलं आहे की, जान कुमार सानू... मराठी भाषेची याला चीड येते म्हणे. अरे तू कीड आहेस मोठी... मुंबईतून हाकलून देण्यासाठी याला मी नॉमिनेट करतोय, असं अमेय खोपकर यांनी म्हटलं आहे.