Drugs Case | भारती सिंह आणि हर्ष लिंबाचियाला 14 दिवसांची न्यायलयीन कोठडी

Continues below advertisement

मुंबई : कॉमेडियन भारती आणि तिचा पती हर्ष लिंबाचिया या दोघांनाही मुंबईच्या किल्ला कोर्टाने 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. त्यामुळे दोघांसमोरही जामीनासाठी अर्ज करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. दोघांनीही जामीनासाठी अर्ज केलेला आहे. आता दोघांच्याही जामीन अर्जावर उद्या (सोमवार) सुनावणी केली जाणार आहे. भारती आणि हर्ष यांच्यासोबतच इतर दोन ड्रग्ज पेडलर्सनाही कोर्टासमोर हजर करण्यात आलं असून दोघांनाही पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

दोघांच्या घरातून 86.5 ग्रॅम गांजा जप्त

घरात गांजा सापडल्यानंतर दोघांनाही प्रथम एनसीबीने ताब्यात घेतले. चौकशीनंतर भारती सिंह हिला अटक करण्यात आली आहे. शुक्रवारी एक ड्रग पॅडलरला पकडण्यात आले. त्याच्या चौकशीनंतर आज भारती आणि हर्षच्या घरावर छापा टाकण्यात आला. या छाप्यात दोघांच्या घरात 86.5 ग्रॅम गांजा सापडला. या जप्तीनंतर दोघांना एनसीबी कार्यालयात आणण्यात आले.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram