Kiran Mane : आरोप करणाऱ्या महिला कलाकाराचे पती भाजपचे पदाधिकारी : अभिनेते किरण माने
अभिनेते किरण माने यांना टीव्ही मालिकेतून काढून टाकण्यात आलं आणि त्यावरून वाद निर्माण झालाय. राजकीय भूमिका मांडल्यानं त्यांना मालिकेतून काढल्याचा आरोप होतोय. स्टार प्रवाह वाहिनीवरील मुलगी झाली हो या मालिकेतील काही कलाकारांनी माने यांच्याविरोधात आरोप केलेत, तर काही कलाकारांनी किरण माने यांचं समर्थन केलंय. या पार्श्वभूमीवर आपल्याविरोधात षडयंत्र रचण्यात आल्याचा आरोप किरण माने यांनी केलाय. आरोप करणाऱ्या महिला कलाकाराचे पती भाजपचे पदाधिकारी असल्याचा दावा माने यांनी केलाय. किरण माने यांच्याशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी विनायक पाटील यांनी....