Exclusive Interview : सफाई कामगाराचा मुलगा ते National Award... Kastoori सिनेमाच्या टीमशी खास संवाद

Continues below advertisement

चित्रपट प्रेमींसाठी अत्यंत महत्वाचा असलेल्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा मार्च महिन्यात करण्यात आली.  या पुरस्कारांचे वितरण नुकतेच उपराष्ट्रपती व्यंकय्या नायुडू, केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांच्याहस्ते झाले. यावेळी रजनीकांत यांच्यासह अनेक दिग्गज कलाकार उपस्थित होते. या पुरस्कारांमध्ये काही मराठी चित्रपटांना विविध विभागात पुरस्कार मिळाले. या पुरस्कारात गेल्यावर्षीप्रमाणे यंदाही सोलापूर जिल्ह्यातील बार्शीतल्या पोरांनी हवा केली. बार्शीतला तरुण दिग्दर्शक विनोद कांबळेच्या 'कस्तुरी'ला सर्वोत्कृष्ट बाल चित्रपटाचा पुरस्कार मिळाला. विनोदनं हा पुरस्कार उपराष्ट्रपतींच्या हस्ते स्विकारला. बार्शीतला अभिनेता विठ्ठल काळेंच्या काजरोला देखील राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे. याआधी बार्शीतील अमर देवकर यांच्या म्होरक्या या चित्रपटाला देखील राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता.  विनोद कांबळे आणि कस्तुरीच्या टीमसोबत एबीपी माझा डिजिटलनं खास संवाद साधला... 


विनोदच्या 'कस्तुरी'चा दरवळ

इंजिनियरिंग सोडून आवड जपण्यासाठी चित्रपट क्षेत्राकडे वळलेल्या विनोद कांबळेनं पुन्हा एकदा बार्शीचं नाव राष्ट्रीय पातळीवर चमकवलं आहे. विनोद कांबळे लिखित आणि दिग्दर्शित कस्तुरी या सिनेमाला सर्वोत्कृष्ट बाल चित्रपटाचा पुरस्कार मिळाला आहे. विशेष म्हणजे अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतून विनोदनं या सिनेमाची निर्मिती केली आहे. पोस्टमार्टम करणाऱ्या एका लहान मुलाच्या स्वप्नाची गोष्ट असलेल्या कस्तुरीचा दरवळ आज राष्ट्रीय स्तरावर पोहोचला आहे. याआधीही कस्तुरी सिनेमानं देशासह जगभरातील काही महत्वाच्या फिल्म फेस्टिव्हलमध्ये प्रेक्षकांची पसंती मिळवली होती. आता त्यावर राष्ट्रीय पुरस्काराची मोहर लागली आहे. विशेष म्हणजे या चित्रपटात सर्व स्थानिक कलाकार आहेत.


संघर्षातून पुढे येत पुरस्कारावर कोरलं नाव

विनोद कांबळेनं अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतून पुरस्कारापर्यंत प्रवास केलाय. विनोद कांबळेची घरची परिस्थिती बेताची. विनोदचे वडील आजही बार्शी नगरपालिकेत सफाई कामगार म्हणून काम करतात. त्यात इंजिनियरिंग सोडून त्याने चित्रपटाची आवड असल्याने मार्ग अवलंबला. विनोदनं याआधीही केलेल्या पोस्टमार्टम या लघुचित्रपटाला देखील अनेक पुरस्कार मिळाले होते. विनोदने म्होरक्या या गेल्या वर्षीच्या राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या सिनेमासाठी देखील सहायक दिग्दर्शक म्हणून काम केलं होतं. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram