Shivpratap Garudzep Amol Kolhe : छत्रपती शिवरायांच्या पराक्रमाची गाथा थेट आग्र्याच्या किल्ल्यातून
abp majha web team
Updated at:
14 Jul 2022 03:28 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppAmol Kolhe : अभिनेते अमोल कोल्हे (Amol Kolhe) यांच्या 'शिवप्रताप गरुडझेप' (Shivpratap Garudjhep) या चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात करण्यात आली आहे. छत्रपती शिवरायांच्या पराक्रमाची गाथा या चित्रपटातून मांडण्यात येणार आहे. आग्र्यातल्या लाल किल्ल्यात चित्रित होणारा 'शिवप्रताप गरुडझेप' हा पहिला मराठी चित्रपट आहे. 'शिवप्रताप गरुडझेप' चित्रपटात अमोल कोल्हे हे छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारणार आहेत. 'शिवप्रताप गरुडझेप' चित्रपटाबद्दल एबीपी माझाला दिलेल्या मुलाखतीमध्ये अमोल कोल्हे यांनी सांगितलं की, 'केवळ मुघलच नव्हे तर संपूर्ण हिंदुस्तानला स्वाभिमान काय असतं हे महाराजांनी दाखवून दिलं. कलाकार म्हणून या वास्तुत, या पेहरावात पाऊल टाकायला मिळणं हे माझं परमभाग्य आहे.'