Shivpratap Garudzep : Anurag Thakur यांचा प्रश्न,अमोल कोल्हेंनी सिनेमाचा Canvas बदलला, संपूर्ण कहाणी
Shivpratap Garudzep : अभिनेत्री, दिग्दर्शिका आणि निर्माती अशी चौफेर मुशाफिरी करत अभिनेत्री मनवा नाईकने (Manava Naik) आपली स्वत:ची वेगळी अशी ओळख निर्माण केली आहे. निर्मात्याच्या भूमिकेत शिरल्यानंतर अभिनेत्री म्हणून ती अभावानेच दिसली. मात्र, बऱ्याच कालावधीनंतर आता ती पुन्हा एकदा अभिनेत्री म्हणून प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यास सज्ज झाली आहे. 'शिवप्रताप गरुडझेप' या चित्रपटात ती महत्त्वपूर्ण भूमिकेत झळकणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पत्नीची सोयराबाई मोहिते यांची महत्त्वपूर्ण भूमिका ती यात साकारणार आहे. 'जगदंब क्रिएशन' प्रस्तुत आणि डॉ. अमोल रामसिंग कोल्हे निर्मित 'शिवप्रताप गरुडझेप' चित्रपटाचे दिग्दर्शन कार्तिक राजाराम केंढे यांनी केले आहे. 5 ऑक्टोबरला 'शिवप्रताप गरुडझेप' प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
Tags :
Chhatrapati Shivaji Maharaj Anurag Thakur Shivpratap Garudzep Shivpratap Garudzep Film Amo Kolhe