Shahrukh Khan Threatened : शाहरुख खानला जिवंत जाळणार, पठाण सिनेमाच्या वादातून धमकी

Continues below advertisement


शाहरुख खानच्या पठाण या चित्रपटावरुन वाद सुरुच आहे... या चित्रपटातील 'बेशरम रंग' हे गाणं हटवावं अशी मागणी केली जातेय... हिंदुत्ववादी संघटनांकडून या चित्रपटाला आणि शाहरुख खानला रोज वेगवेगळे इशारे दिले जातायत..  आता त्यात अयोध्याचे परमहंस आचार्य यांनी तर शाहरुख खानला थेट जिवंत जाळण्याचीच धमकी दिलीेय.. तसंच माझे लोक मुंबईमध्ये असून ते शाहरुख खानला शोधत आहेत. त्याला जो कोणी मारेल त्याच्या परिवाराला आर्थिक मदत करणार आणि त्याचा खटलाही लढवणार असल्याचं आचार्य परमहंस यांनी म्हटलंय.. शाहरुखने भगव्या रंगाचा अपमान केला असून त्यामागे हिंदुंच्या भावना दुखवण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप त्यांनी केलाय. 

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram