Shah Rukh Khan Hospitalized : शाहरुख खानची तब्येत बिघडली, तातडीने रुग्णालयात दाखल

Continues below advertisement

अहमदाबाद : सध्या आयपीएल हंगामात व्यस्त असलेला बॉलिवूडचा बादशहा शाहरुख खानला (Shahrukh Khan) रुग्णालयात दाखल करण्या आलं आहे. कडाक्याच्या उन्हामुळे त्याला त्रास होत असल्याने प्रकृती अस्वास्थतेमुळे शाहरुखला अहमदाबादमधील केडी हॉस्पीटलमध्ये दाखल करण्यात आलं आहे. कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध हैदराबाद सनरायजर्सं यांच्यात मंगळवारी आयपीएलच्या (IPL) हंगामातील क्वालिफायर सामना झाला. या सामन्यात शाहरुख खानची मालकी असलेल्या केकेआरने बाजी मारली. त्यानंतर, शाहरुखने स्वत: मैदानात फिरुन चाहत्याचे अभिवादन केले होते. तसेच, केकेआरच्या विजयाचा .जल्लोषही साजरा केला होता. मात्र, आज उष्माघातामुळे शाहरुखला रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. 

शाहरुख सध्या केकेआर टीमसह अहमदाबादमध्ये आहे. आयपीएल हंगामातील यंदाचे सामने तो सहकुटुंब एन्जॉय करताना दिसून येतो. अहमदाबादमध्येही उन्हाळ्याचा कडाका जाणवत असून तिथे 40 अंश सेल्सियस एवढे तापमाने आहे. शाहरुखला आज दुपारी अस्वस्थ वाटू लागल्याने अहमदाबादच्या केडी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं आहे. सध्या, शाहरुखला डॉक्टरांच्या देखरेखीखाली ठेवण्यात आलं असून शाहरुखची प्रकृती उत्तम आहे. केवळ, उष्माघाताचा त्रास जाणवू लागल्याने अभिनेत्यास रुग्णालयात भरती करण्यात आले. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram