Rekha Kamat: जेष्ठ अभिनेत्री रेखा कामत यांचं निधन : ABP Majha

आजच्या तरुणाईची लाडकी आजी ज्येष्ठ अभिनेत्री रेखा कामत यांचे आज सकाळी मुंबईत निधन झाले. वयाच्या 89 व्या वर्षी वृद्धापकाळाने माहिम इथल्या निवासस्थानी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. आजच्या तरुणांना त्या आजी म्हणून ठाऊक असल्या तरी त्यांनी कृष्णधवल चित्रपटांमध्येही नायिका म्हणून केलेल्या भूमिका गाजल्या होत्या. 1952 मध्ये प्रदर्शित 'लाखाची गोष्ट' हा रेखा कामत यांचा पहिला चित्रपट. याच त्यांची बहिण चित्रा यांनीसुद्धा काम केलं होतं. राजा परांजपे, ग. दि माडगूळकर आणि सुधीर फडके यांनी या चित्रपटाची निर्मिती केली होती. कुमुद आणि कुसुम ही जुन्या वळणाची नावं नकोत, चित्रपटासाठी जरा आकर्षक नावं पाहिजेत म्हणून 'गदिमां'नी रेखा आणि चित्रा असं या बहिणींचं नामकरण केलं होतं.

 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola