Mumbai Drugs : चौकशीसाठी उशिरा दाखल झाल्यानं समीर वानखेडे यांनी अनन्या पांडेला झापलं ?

Continues below advertisement

एनसीबीकडून अभिनेत्री अनन्या पांडे हिच्या आर्थिक व्यवहारांचीही चौकशी होणार आहे. अनन्याचे काही पैशांचे व्यवहार एनसीबीच्या रडारवर आहेत. आतापर्यंत तिच्या आर्यन खानबरोबरच्या व्हॉट्सअॅप चॅटसंदर्भात चौकशी करण्यात आलीय. आता पैशांच्या व्यवहारांची चौकशी केली जाणार आहे. दरम्यान, एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांनी अभिनेत्री अनन्या पांडे हिला काल फटकारल्याचं कळतंय.. चौकशीसाठी काल उशिरा दाखल झाल्यानं समीर वानखेडे काहीसे संतप्त झाले होते. चौकशीसाठी 11 वाजताची वेळ दिली असताना अनन्या दुपारी 2 वाजता पोहोचली, त्यामुळं वानखेडेंनी अनन्या पांडेची शाळा घेतली. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram