Salman Khan Threat : सलमानला ईमेलने धमकी, राजस्थानमधून एक जण ताब्यात

बॉलिवूडचा सुपरस्टार सलमान खानला धमकी दिल्याप्रकरणी मुंबई पोलिसांनी जोधपूर येथून आरोपी धाकड राम विश्नोईला अटक केलीय. आज आरोपीला कोर्टात हजर केलं जाईल .. आरोपीने सलमानला ई-मेलद्वारे जीवे मारण्याची धमकी दिली होती. सलमाननं मुंबईतील वांद्रे पोलीस ठाण्यात जीवे मारण्याची धमकी दिल्याचा गुन्हा दाखल केला होता. आता २१ वर्षीय धाकड राम विश्नोईला पोलिसांनी मुंबईत आणले आहे. धाकड राम विश्नोईवर पंजाबी गायक सिद्धू मूसेवालाच्या वडिलांना धमकावल्याचाही आरोप आहे. सलमानला धमक्या मिळत असल्यानं पोलिसांनी त्याच्या सुरक्षेत आणखी वाढ केलीय.


JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola