Salman Khan House Firing Case : सलमान खानच्या घराबाहेर गोळीबार करणाऱ्यांना मदत करणारे ताब्यात!
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppSalman Khan : बॉलिवूडचा दबंगस्टार सलमान खानच्या (Salman Khan) घरावर गोळीबार केल्याप्रकरणी चंदिगड पोलिसांनी तीन संशयितांना अटक केली आहे. हे तिन्ही संशयित आरोपी बिष्णोई टोळीशी संबंधित आहे. या तिघांना हल्ल्याचा कट आखल्याप्रकरणी आणि सलमान खानच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींना मदत केल्याप्रकरणी अटक करण्यात आली आहे.
चंदिगड पोलीस गुन्हे शाखेच्या डीएसपी उदय पाल यांनी सांगितले की, चंदिगडच्या दादुमाजरा कॉलनीमधून रविंदर सिंह आणि पंजाबच्या फाजिल्का येथून जावेद झिंजा यांना 25 मे रोजी अटक करण्यात आली. या संशयित आरोपींच्या चौकशीनंतर मोहाली येथील करण कपूरला अटक करण्यात आली. स्थानिक न्यायालयाने सोमवारी त्यांना पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.