Dr. Kanak Rele : शास्त्रीय नृत्यांगना कनक रेळे यांचं निधन; पद्मभूषण पुरस्काराने केलेलं सन्मानित
ज्येष्ठ शास्त्रीय नृत्यांगना पद्मभूषण डॉ. कनक रेळे यांचं निधन झालं. मुंबईतल्या राहत्या घरी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.. त्या ८५ वर्षांच्या होत्या. मोहिनीअट्टम आणि कथकली या नृत्यप्रकारात त्या पारंगत होत्या. १९६६ साली त्यांनी मुंबईत नालंदा डान्स अँड रीसर्च सेन्टर आणि नालंदा नृत्यकला महाविद्यालयाची स्थापना केली... गरीब घरातल्या नृत्यप्रेमी मुलींसाठी नृत्य शिकण्याची संधी मिळावी यासाठी त्यांनी या संस्थांचं शुल्कही कमी ठेवलं होत. कनक रेळे यांना पद्मभूषण, कालिदास सन्मान, संगीत नाटक अकादमी अॅवॉर्ड, अशा अनेक पुरस्कारांनी आजवर सन्मानित करण्यात आलं आहे... डॉ. कनक रेळे यांना एबीपी माझाचीही आदरांजली
Tags :
Kanak Rele Classical Dancer Nalanda Dance Research Centre Mohiniattam Dancer Kathakali Dancer