Ranveer Deepika Car Video : बायकोसाठी स्वतः उघडलं कारचं दार, रणवीर-दीपिका EXCLUSIVE
Deepika Padukone-Ranveer Singh : लोकसभा निवडणुकांसाठी (Lok Sabha 2024) महाराष्ट्रात शेवटच्या टप्प्यातील मतदानाची प्रक्रिया पार पडत आहे. अगदी सर्वसामान्यांपासून ते कलाकार मंडळींपर्यंत साऱ्यांनीच आपल्या मतदानाचा हक्क बजावला. अमिताभ बच्चन, सचिन तेंडूलकर, रेखा ते रणबीर कपूर, रणवीर सिंग, दीपिका पादुकोण यांसह अनेक कलाकारांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावला आहे. त्याचप्रमाणे या कलाकारांनी इतरांनाही मतदानाचा हक्क बजावण्याचे आवाहन केले आहे. पण यासगळ्यामध्ये विशेष चर्चा झाली ती, होणाऱ्या आई आणि बाबाची, म्हणजेच अभिनेता रणवीर सिंह (Raveer Singh) आणि दीपिका पादुकोण (Deepika Padukon) या दोघांची.
मतदानाला आल्यावर सर्वांच्याच नजरा या दीपिकाच्या बेबी बंपवर गेल्या. व्हाईट कलरच्या लूज शर्टमध्ये दीपिकाचे बेबीबंप दिसलं. दीपिकाचे हे व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले आहेत. दीपिका आणि रणवीर या दोघांनी काही दिवसांपूर्वी त्यांच्या सोशल मीडियावर त्यांच्या घरी नवा पाहुणा येणार असल्याची गुडन्यूज त्यांच्या चाहत्यांना दिली. त्यानंतर सोशल मीडियावर त्यांचीच चर्चा सुरु होती.