Raju Srivastava Health Update: प्रसिद्ध कॉमेडियन राजू श्रीवास्तव यांची प्रकृती चिंताजनक

Raju Srivastava Health Update : प्रसिद्ध कॉमेडियन राजू श्रीवास्तव (Raju Srivastav) यांना काल (10 ऑगस्ट) दिल्लीमधील (Delhi) एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आलं.  त्यांना हृदयविकाराचा झटका आला होता. राजू श्रीवास्तव यांच्यावर सध्या एम्स रुग्णालयात उपचार सुरु आहेत. रिपोर्टनुसार, राजू श्रीवास्तव यांच्यावर अँजिओप्लास्टी  ही शस्त्रक्रिया पार पडली आहे. राजू श्रीवास्तव यांची प्रकृती ठिक होण्यासाठी त्यांचे चाहते आणि सेलिब्रिटी प्रार्थना करत आहेत.

 
 
 
 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola