Oscars 2021 | 'अॅण्ड दी ऑस्कर गोज टू...'; नोमॅडलँड ठरला 2021चा सर्वोत्कृष्ट चित्रपट
Oscars 2021 कलाविश्वात अतिशय मानाच्या समजल्या जाणाऱ्या ऑस्कर पुरस्कार सोहळ्याला सुरुवात झाली असून, एकामागून एक कलाकाविष्कारांचा गौरव या सोहळ्याक झाल्याचं पाहायला मिळालं. अमेरिकेतील लॉस एंजेलिस येथे 93 व्या ऑस्कर सोहळ्यात विविध विभागातील पुरस्कार प्रदान करण्यात आले. यंदाचा पुरस्कार सोहळा यासाठी खास आहे, कारण त्याचं सूत्रसंचालन कोणाच्याही हाती नसून कोणी प्रेक्षकही या सोहळ्यासाठी उपस्थित नाहीत.
नेटफ्लिक्सनं यंदाच्या पुरस्कार सोहळ्यात चांगलाच दबदबा प्रस्थापित केल्याचं दिसून आलं. तब्बल 36 नामांकनं एकट्या नेटफ्लिक्सकडे होती. यामध्ये डेविड फिन्चरचा ब्लॅक एंड व्हाइट ड्रामा 'मैनक'चाही समावेश आहे.
या सोहळ्यात सर्वोत्कृष्ट ठरलेले काही चित्रपट असे, सर्वोत्कृष्ट चित्रपट नोमॅडलॅंड. सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक - शॅलो झॅओ, सर्वोत्कृष्ट अभिनेत्री - फ्रान्सिस मॅकडरमंड ( नोमॅडलॅंड), सर्वोत्कृष्ट अभिनेता - एंथनी हॉपकिन्स (द फादर), सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता - डॅनिअल कलुआ (ज्युडस एंड द ब्लॅक मसाया) सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री -यो जंग यौन (मिनारी), सर्वोत्कृष्ट एनिमेटेड फिल्म - साऊल, सर्वोत्कृष्ट फॉरेन लॅंग्वेज फिल्म - अनादर राऊंड (डेन्मार्क).