Netflix : नेटफ्लिक्सला कोर्टाचा मोठा दिलासा, Sheena Bora आधारित सीरीजला प्रदर्शित करण्यास परवानगी
नेटफ्लिक्सला मुंबई हायकोर्टानं मोठा दिलासा दिला आहे. शीना बोरा मर्डर केसवर आधारित वेब सीरीजला प्रदर्शित करण्यास मुंबई हायकोर्टानं परवानगी दिली आहे. सीबीआयनं याचिका दाखल करत या वेब सीरीजच्या प्रदर्शनाला विरोध केला होता. यामुळे खटल्यावर परिणाम होईल, असा दावा सीबीआयनं केला होता. मात्र कोर्टानं स्वतः हा चित्रपट पाहिला आणि त्यात काहीही आक्षेपार्ह नाही असं म्हणत वेब सीरीज प्रदर्शित करण्यास परवानगी दिली.