Nawazuddin Siddiqui : नवाजुद्दीन सिद्दीकीचा OTT प्लॅटफॉर्मला रामराम, प्लॅटफॉर्मवरील कंटेटबाबत नाराज
OTT प्लॅटफॉर्म धंदा बनलाय, आता येथे काम करणार नाही! नवाजुद्दीनचा मोठा निर्णय
सोशल मीडियाच्या या जमान्यामध्ये लोकं आता मनोरंजनाचे कार्यक्रम पाहण्यासाठी OTT प्लॅटफॉर्मला प्राधान्य देतात. त्यामुळे अनेक बडे कलाकार OTT प्लॅटफॉर्मवरील चित्रपट, वेब सीरिजमध्ये दिसले.
यापैकीच एक म्हणजे नवाजुद्दीन सिद्दीकी. 'सेक्रेड गेम्स'मध्ये नवाजुद्दीन सिद्दीकी याने साकारलेली गणेश गायतोंडेची भूमिका प्रचंड गाजली होती. मात्र आता नवाजुद्दीनने मोठा निर्णय घेत OTT प्लॅटफॉर्मला रामराम केला आहे. यामुळे त्याचे चाहते नाराज झाले आहेत.
नवाजुद्दीन सिद्दीकी सुरुवातीपासून OTT प्लॅटफॉर्मवर दिसला आहे. त्याने OTT प्लॅटफॉर्मवरील 'रात अकेली है', 'धुमकेतू' आणि 'सीरियस मॅन' यासारख्या चांगल्या चित्रपटांमध्ये काम केले आहे. तसेच 'सेक्रेड गेम्स'मधील त्याची भूमिकाही लोकांना खूप आवडली होती. कोरोना काळामध्ये OTT प्लॅटफॉर्मच प्रेक्षकांचे मनोरंजनाचे साधन बनले होते. मात्र गेल्या काही काळापासून नवाजुद्दीन OTT प्लॅटफॉर्मवरील कंटेटबाबत नाराजी व्यक्त करताना दिसला.
एका मुलाखतीमध्ये बोलताना नवाजुद्दीन म्हणाला की, OTT प्लॅटफॉर्म मोठ्या प्रोडक्शन हाउससाठी धंदा बनला आहे. हा प्लॅटफॉर्म अनावश्यक शोसाठी डंपिंग ग्राउंड झाला आहे. येथे असे शो आहेत जे पाहण्यालायक नाही, तसेच असे सिक्वल आहेत ज्यामध्ये काहीही नाही. मी जेव्हा 'सेक्रेड गेम्स' मध्ये काम केले होते तेव्हा डिजिटल प्लॅटफॉर्ममध्ये काम करण्याचा उत्साह होता, एक आव्हान होते. मात्र आता तो उत्साह निघून गेला आहे.
OTT प्लॅटफॉर्म आता बड्या प्रोडक्शन हाऊस आणि अभिनेत्यांसाठी धंदा बनला आहे. बॉलिवूडच्या अनेक बड्या चित्रपट निर्मात्यांनी सर्व मोठ्या OTT प्लॅटफॉर्मसोबत करार केलेले आहेत. अनलिमिटेड कंटेटसाठी येथे निर्मात्यांना मजबूत रक्कमही मिळते. मात्र यामुळे गुणवत्ता कमी झाली आहे, असे नवाजुद्दीने म्हटले.
मला आता OTT प्लॅटफॉर्मवरील कंटेट पाहूशी वाटत नाही, त्यामुळे मी त्यात कसे काम करू शकतो. ओटीटीवरील सो-कॉल्ड स्टार्स आता मोठी रक्कम मागत असून ए-लिस्टमधील स्टार्सप्रमाणे नखरे दाखवत आहेत. मात्र ते विसरतात की कटेंट किंग आहे, असेही तो म्हणाला.