Munjya Aditya Sarpotdar : बॉक्स ऑफिसवर करोडोची उलाढाल करणाऱ्या 'मुंज्या'चे दिग्दर्शक माझावर

Munjya Aditya Sarpotdar : बॉक्स ऑफिसवर करोडोची उलाढाल करणाऱ्या 'मुंज्या'चे दिग्दर्शक माझावर

'मुंज्या' बॉक्स ऑफिसवर रोज कमाल करत आहे. कोणत्याही मोठ्या स्टार कलाकाराशिवाय चित्रपट प्रेक्षकांना आपल्याकडे खेचण्यास यशस्वी झाला आहे.  चित्रपटाचे कथानक, कलाकारांचा अभिनय, व्हीएफएक्स यामुळे चित्रपटाला प्रेक्षकांची पसंती मिळत आहे.  'मुंज्या' आता दुसऱ्या आठवड्यातही चांगली कमाई  करत आहे. मुंज्याने रिलीजच्या पहिल्याच दिवशी 4 कोटींची कमाई केली होती. 

या चित्रपटाने दुसऱ्या दिवशी 7.25 कोटी रुपये, तिसऱ्या दिवशी 8 कोटी रुपये, चौथ्या दिवशी 4 कोटी रुपये, पाचव्या दिवशी 4.15 कोटी रुपये, सहाव्या दिवशी 4 कोटी रुपये आणि सातव्या दिवशी 3.9 कोटी रुपयांची कमाई केली. रिलीजच्या पहिल्याच आठवड्यात  'मुंज्या'ने  35.3 कोटींची कमाई केली. 'मुंज्या'ने  दुसऱ्या आठवड्याच्या दुसऱ्या शुक्रवारी 3.5 कोटी रुपये, दुसऱ्या शनिवारी 6.5 कोटी रुपये, दुसऱ्या रविवारी 8.5 कोटी रुपये आणि दुसऱ्या सोमवारी 5.25 कोटी रुपये कमवले. आता 'मुंज्या'च्या रिलीजच्या 12व्या दिवसाच्या म्हणजेच दुसऱ्या मंगळवारी किती कमाई केली, याचा प्राथमिक अंदाज समोर आला आहे. 

सॅकनिल्कच्या रिपोर्टनुसार, मुंज्याने रिलीजच्या 12 व्या दिवशी 3.40 कोटींची कमाई केल्याचा अंदाज आहे. अशा प्रकारे 'मुंज्या'ने बाराव्या दिवशी 62.45 कोटींची कमाई केली. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola