Ameya Khopkar On Adipurush : चित्रपट कर्मचारी सेनेचा ‘आदिपुरुष’ निर्मितीला पूर्ण पाठिंबा : खोपकर
Ameya Khopkar On Adipurush : देवीदेवतांचं विडंबन केल्याच्या आरोपावरून भाजपच्या राम कदम यांनी आदिपुरुष सिनेमाला विरोध केलाय. मात्र मनसेनं चित्रपटाला पाठिंबा दिलाय. मनसे चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर यांनी याबाबत एक पत्रक काढलंय. ओम राऊत यांच्या आगामी ‘आदिपुरुष’ टीझरवरुन टीका होणं हे दुर्दैवी आहे. ओम राऊत आणि सहकाऱ्यांच्या प्रामाणिक प्रयत्नांची प्रचिती चित्रपट प्रदर्शित झाल्यावर येईल अशी आम्हाला खात्री आहे. म्हणूनच महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट कर्मचारी सेनेचा ‘आदिपुरुष’ निर्मितीला पूर्ण पाठिंबा आहे. असं मत अमेय खोपकर यांनी व्यक्त केलं आहे.