इंटरनेटवर धुमाकूळ घालणाऱ्या 'ओ शेठ' गाण्याची चोरी, गायकानंच गाणं चोरल्याचा संगीतकारांचा आरोप
Continues below advertisement
सोशल मीडियातून (Social Media) कधी कोण हिरो होईल आणि कधी कुणी झिरो होईल हे सांगता येत नाही. आपली एखादी गोष्ट इथं कधी ट्रेंड होईल हे सांगता येत नाही. त्यात यूट्यूब सारख्या प्लॅटफॉर्ममुळं अनेकांना आपलं टॅलेंट दाखवण्याची संधी मिळाली आहे. काही जणांनी या संधीचं सोनंही केलं आहे. सध्या यूट्यूब, फेसबुक, व्हाट्सऍप, इन्स्टाग्रामवर सगळीकडे "ओ शेऽऽऽठ तुम्ही नादच केलाय थेट' (O Shet Marathi song) या गाण्याचा ट्रेंड पाहायला मिळतोय. हे गाणं बनवलंय म्हणजे लिहिलं, संगीतबद्ध केलं उस्मानाबादच्या प्रणिकेत खुणे (Praniket Khune) आणि नाशिकच्या संध्या केशे (Sandhya Keshe)यांनी. तर गायलं उमेश गवळी (umesh gawali) यांनी. आता हेच गाणं चोरीला गेल्याचा आरोप या गाण्याच्या निर्मात्यांनी केला आहे.
Continues below advertisement