Marathi Films : दीड वर्षांनंतर मराठी सिनेमे पुन्हा Box Officer वर, आज झिम्मा आणि अजिंक्य प्रदर्शित
तब्बल दीड वर्षांच्या इंटर्व्हलनंतर मराठी सिनेमा पुन्हा एकदा थिएटरमध्ये दाखल झालाय. 18 महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर आज दोन मराठी सिनेमे प्रदर्शित झालेत. हेमंत ढोमेचं दिग्दर्शन असलेला झिम्मा आणि भूषण प्रधान-प्रार्थना बेहेरे यांची मुख्य भूमिका असलेला अजिंक्य हे दोन सिनेमे आपल्या भेटीला आलेत. कोविड मुळं अवघ्या मनोरंजन इंडस्ट्रीचं कंबरडं मोडलं. सिनेमाच्या शूटिंगपासून रिलीजपर्यंत प्रत्येक गोष्टीला ब्रेक लागला. या संकटातून सावरत पुन्हा एकदा उभं राहाण्यासाठी मराठी सिनेमा सज्ज झालाय. आता या दोन सिनेमांना प्रेक्षक कसे स्विकारतात, बॉक्स ऑफिसवर गल्ला कसा जमवतात याकडेच अवघ्या मराठी सिनेविश्वाचं लक्ष आहे.