Mahesh Manjrekar: माझा चित्रपट टीकाकरांच्या टाकेवर बोलेल- महेश मांजरेकर ABP Majha

मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध चित्रपट निर्माते आणि दिग्दर्शक महेश मांजरेकरांच्या  (Mahesh Manjrekar) वेगवेगळ्या विषयांवरील चित्रपटांना प्रेक्षकांची पसंती मिळते. लवकरच त्यांचा  'नाय वरनभात लोन्चा कोन नाय कोन्चा' (Naay Varanbhaat Loncha Kon Naay Koncha) हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित करण्यात आला होता. परंतू या चित्रपटातीत दाखण्यात आलेल्या दृष्यांमुळे महिला आयोगाने  या चित्रपटाविरोधात तक्रार नोंदवली. त्यामुळे आता या चित्रपटाचा ट्रेलर सर्व प्लॅटफोर्मवरून हटवण्यात आला आहे. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola