
Mughal-E-Azam : रंगभूमीवरचं महानाट्य मुघल-ए-आझम, फिरोज अब्बास खान यांचं दिग्दर्शन
Continues below advertisement
मुघले आझम ... भारती सिने इतिहासातले सुवर्ण पान... कित्येक दशकांनंतर आजही या सिनेमाची जादू कायम आहे... डोळे दिपवणारे भव्य सेट्स.. दिग्गज कलाकारांचा कमाल परफॉर्मन्स... नौशाद यांचं थेट काळजाला हात घालणारं संगीत आणि अर्थातच तितक्याच ताकदीचं दिग्दर्शन... या साऱ्यातून मुघले आझम सारखी अभिजात आणि अविस्मरणीय कलाकृती घडली... हीच कलाकृती नाटकरुपानं रसिकांसमोर आणण्याचं धाडस दिग्दर्शक फिरोज अब्बास खान यांनी केलं. आणि आकारालं आलं... मुघल-ए-आझम म्युझिकल.... करोडो रुपये खर्च करून जन्माला आलेल्या या नाटकात मुख्य भूमिका साकारत आहे मराठमोळी अभिनेत्री प्रियंका बर्वे.. पाहुया कसं आहे हे रंगभूमीवरचं महानाट्य
Continues below advertisement