Kajol : काजोलच्या 'त्या' वक्तव्याने खळबळ, अखेर ट्रोल झाल्यानंतर स्पष्टीकरण
दमदार अभिनय आणि स्पष्टवक्तेपणासाठी ओळखली जाणारी बॉलीवूड अभिनेत्री काजोलने 'देशांतील नेते अशिक्षित' असल्याचे वक्तव्य केले आहे. यावरून काजोल सोशल मीडियावर प्रचंड ट्रोल होत आहे. ट्रोल झाल्यानंतर काजोलने तिच्या व्हायरल वक्तव्यावर स्पष्टीकरण दिले. तिने ट्विट करत लिहिलं, 'मी फक्त शिक्षण आणि त्याचे महत्त्व यावर बोलत होते. कोणत्याही राजकीय नेत्याला कमी लेखण्याचा माझा उद्देश नव्हता. आपल्याकडे असे काही महान नेते आहेत जे देशाला योग्य मार्गावर घेऊन जात आहेत. असा खुलासा काजोलने केलाय..