Jacqueline Fernandez : 215 कोटींच्या खंडणीप्रकरणी जॅकलिन फर्नांडिस विरोधात आरोपपत्र, काय आहे प्रकरण
Continues below advertisement
Jacqueline Fernandez : अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसच्या अडचणीत वाढ झाली आहे. 215 कोटींच्या खंडणीप्रकरणी अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस आरोपपत्र दाखल करण्यात आलं आहे. सुकेश चंद्रशेखर प्रकरणात पुरवणी आरोपपत्र दाखल करण्यात आलं आहे. सुत्राकडून मिळालेल्या माहितीनुसार, अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसला माहिती होती की, सुकेश चंद्रशेखर (Sukesh Chandrasekhar) खंडणी वसुल करणार आहे. त्यानंतर आता अंमलबजावणी संचालनालयाने (ED - Enforcement Directorate) अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसवर आरोपपत्र दाखल केलं आहे. ईडीने 215 कोटींच्या खंडणी प्रकरणात जॅकलिन फर्नांडिस आरोपी असल्याचं म्हटलं आहे.
Continues below advertisement