Arun Bali Death : ज्येष्ठ अभिनेते अरुण बाली यांचं निधन, 79व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
Continues below advertisement
Arun Bali Passes Away: बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते अरुण बाली (Arun Bali) यांचे आज (7 ऑक्टोबर) निधन झाले. वयाच्या 79व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ज्येष्ठ अभिनेते अरुण बाली (Arun Bali Passes Away) यांनी आपल्या करिअरची सुरुवात 90च्या दशकात केली होती. त्यांनी ‘राजू बन गया जेंटलमन’, ‘फूल और अंगारे’, ‘खलनायक’, ‘3 इडियट्स’, 'केदारनाथ' आणि ‘पानिपत’सह अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. अनेक चित्रपटांमध्ये त्यांनी सहाय्यक भूमिका साकारत प्रेक्षकांकडून वाहवा मिळवली होती.
Continues below advertisement