Salman Khan : बॉलिवूडचा दबंग सलमान खानच्या सुरक्षेत वाढ,बिश्नोई टोळीच्या धमकीनंतर वाय प्लसची सुरक्षा
Salman Khan : मुंबई पोलिस आणि राज्य सरकारसाठी सर्वात मोठी चिंता सलमान खानची सुरक्षा होती कारण त्यांना दिल्ली पोलिसांकडून सलमान खानच्या धमक्यांशी संबंधित अनेक माहिती सतत मिळत होती. सिद्धू मुसेवाला हत्येप्रकरणी अटक करण्यात आलेल्या अनेक आरोपींनी सलमान खानबाबतही अनेक खुलासे केले होते. सूत्रांनी सांगितले की, आरोपींचे जबाब आणि तपास यंत्रणांना मिळालेल्या माहितीचा अहवाल पोलिसांनी राज्याच्या गृह विभागाकडे सोपवला होता, त्यानंतरच सलमान खानला बंदुकीचा परवानाही देण्यात आली होती.