Allu Arjun PC After Bail ' अटक... जेल...जामीन...पुष्पाची पहिली पत्रकार परिषद

Continues below advertisement

Allu Arjun PC After Bail ' अटक... जेल...जामीन...पुष्पाची पहिली पत्रकार परिषद

हैदराबाद : सध्या अल्लू अर्जुनच्या पुष्पा-2 या चित्रपटाची सगळीकडेच चर्चा आहे. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगलीच कमाई करताना दिसतोय. या चित्रपटातील अभिनयामुळे अल्लू अर्जुनची समस्त भारतात जोरदार चर्चा चालू आहे. मात्र गेल्या काही दिवसांपासून हा अभिनेता एका वेगळ्या कारणामुळे चर्चेत आला आहे. या अभिनेत्याला 13 डिसेंबरची रात्र तुरुंगात घालवावी लागली आहे. आज अल्लू अर्जुनची तुरुंगातून सुटका झाली आहे. दरम्यान, आपल्या नवऱ्याला तुरुंगाबाहेर आल्याचं बघताच अल्लू अर्जुनची पत्नी स्नेहा रेड्डी चांगलीच भावूक झाली आहे. तिचा एक व्हिडीओ सध्या चांगलाच व्हायरल होत आहे.

पत्नीने अल्लू अर्जुनला मारली मिठी

अल्लू अर्जुनची आज तुरुंगातून सुटका झाली. तुरुंगाबाहेर येताच तो आपल्या घरी गेला. घरी पोहोचताच अल्लू अर्जुनहची औक्षणही करण्यात आलं. त्यानंतर त्याने सर्वप्रथम आपल्या कुटुंबीयांची भेट घेतली. यावेळी मुलांना समोर पाहताच अल्लू अर्जुनने त्यांना मिठीत घेतलं. मागून त्याची पत्नीही चालत आली. आपला पती तुरुंगाबाहेर आल्याचे आणि तो सुखरुप असल्याचे दिसतच स्नेहा रेड्डीला आभाळ ठेंगणं झालं. तिने कशाचाही विचार न करता आपल्या पतीला कडकडून मिठी मारली. आपल्या नवऱ्याला पाहून स्नेहा चांगलीच भावुक झाली होती. तिचा हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे. आपल्या पतीला समोर पाहून सेन्हाला फार आनंद झाल्याचं या व्हिडीओत दिसतंय. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram