Gaurav More Interview : ...म्हणून मी हास्यजत्रा सोडली, फिल्टरपाड्याचा गौरव मोरे Exclusive

महाराष्ट्राची हास्यजत्रेमधून (Maharashtra HasyaJatra) घराघरांत पोहचलेला गौरव मोरे (Gaurav More) सध्या हिंदी कार्यक्रमातून प्रेक्षकांचं मनोरंजन करतोय. सोनी टिव्हीवरील मॅडनेस मचाऐंगे या कार्यक्रमातून तो भेटीला येतोय. पण तरीही हास्यजत्रेमधील फिल्टरपाड्याचा गौरव मोरे काही केल्या प्रेक्षकांना विसरता येत नाहीये. जेव्हा गौरवने हास्यजत्रा सोडण्याचा निर्णय घेतला, तेव्हा त्याच्या चाहत्यांना धक्का बसला होता. पण त्याने हास्यजत्रा सोडण्याचा निर्णय का घेतला? याविषयी एबीपी माझाला दिलेल्या मुलाखतीमध्ये भाष्य केलं आहे. 

एबीपी माझाला दिलेल्या मुलाखतीमध्ये गौरवने अनेक मुद्द्यांवर भाष्य केलं आहे. तसेच कार्यक्रम सोडणार हे हास्यजत्रेच्या सेटवर पहिल्यांदा कोणाला सांगितलं याविषयी देखील गौरवने खुलासा केलाय. पण त्याच्या हास्यजत्रा सोडण्यामागे नेमकं कारण काय होतं हे जाणून घेण्याची अनेकांना उत्सुकता होती. कामात तोच तोचपणा येत असल्याचं सांगत गौरव मोरेने हास्यजत्रा सोडण्याचं कारण सांगितलं आहे. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola