Dharmendra Passes Away:धर्मेंद्र यांच्या पार्थिवार विले पार्लेच्या स्मशानभूमीत पार पडले अंत्यसंस्कार

Continues below advertisement

Dharmendra Passes Away:धर्मेंद्र यांच्या पार्थिवार विले पार्लेच्या स्मशानभूमीत पार पडले अंत्यसंस्कार 

Dharmendra Passes Away: बॉलिवूडचा (Bollywood News) 'ही-मॅन' (He-Man) सुपरस्टार, हँडसम हंक धर्मेंद्र (Dharmendra) यांनी वयाच्या 89व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. गेल्या काही दिवसांपूर्वी प्रकृती अस्वास्थामुळे धर्मेंद्र (Actor Dharmendra) यांच्यावर मुंबईतील (Mumbai News) ब्रीच कँडी रुग्णालयात (Breach Candy Hospital) उपचार सुरू होते.  तब्येत खालावल्यामुळे धर्मेंद्र (Dharmendra Kewal Krishan Deol) यांना बारा दिवस रुग्णालयात दाखल करण्यात आलेलं. त्यावेळी त्यांची प्रकृती नाजूक असल्यामुळे त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलेलं. नंतर धर्मेंद्र यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आलेला. तेव्हापासून त्यांच्यावर घरीच होते. पण, अखेर त्यांची मृत्यूशी झुंज अपयशी ठरली आणि त्यांनी जगाचा कायमचा निरोप घेतला. तब्बल सहा दशकं सिनेसृष्टीवर राज्य करणारा कोहिनूर हरपल्यानं मोठी पोकळी निर्माण झाली आहे. धर्मेंद्र यांच्या निधनानं अख्खं बॉलिवूड शोकसागरात बुडालं आहे. 

सर्वसामान्य कुटुंबातून आलेला मुलगा इंडस्ट्रीचा 'ही-मॅन' बनला 

धर्मेंद्र यांचा जन्म 8 डिसेंबर 1935 रोजी ब्रिटिश भारतातील पंजाबमधील लुधियाना जिल्ह्यातील नसराली या गावी झाला. आपल्यापैकी अनेकांना ठाऊक नसेल की, त्यांचं खरं नाव केवल कृष्ण देओल होतं. पण, सिनेसृष्टीत त्यांची ओळख धर्मेंद्र अशीच होती. त्यांचा जन्म एका सर्वसामान्य पंजाबी जाट कुटुंबात झालेला. धर्मेंद्र यांचं वडिलोपार्जित गाव लुधियानातील पखोवाल तहसीलमधील रायकोटजवळील डांगो आहे. धर्मेंद्र यांनी त्यांचं सुरुवातीचं आयुष्य सहनेवाल गावात घालवलं आणि लुधियानातील लालटन कलान येथील सरकारी वरिष्ठ माध्यमिक शाळेत शिक्षण घेतलेलं. त्यांचे वडील गावातील शाळेचे मुख्याध्यापक होते. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Continues below advertisement
Sponsored Links by Taboola