Dahi Handi 2022 : दहीहंडी कार्यक्रमांमध्ये सिनेसृष्टीतील कलाकारांनी केलं गोविंदांचं मनोरंजन
Dahihandi 2022 : देशभरात गोपाळकालाचा (Gopalkala) उत्साह पाहायला मिळत आहे. महाराष्ट्रात दहीहंडीचं (Dahihandi) वेगळं आकर्षण आहे. राज्यात दहीहंडीचा विशेष उत्साह दिसत आहे. मुंबई, ठाण्यासह पुण्यात दहीहंडीचा मोठा उत्सव साजरा केला जातो. विविध मंडळांकडून दहीहंडी उत्सवात लाखोंच्या बक्षीस देण्यात येतात. गोविंदा पथकं अनेक महिने मानवी मनोरे लावण्यासाठी सराव करत असतात. कोरोना संकटामुळं यंदा तब्बल दोन वर्षांनी दहीहंडी साजरी होणार आहे. त्यामुळे मुंबई, पुण्यातील गोविंदा पथकं मनोरे रचायला सज्ज झाले आहेत.