Waheeda Rehman : ज्येष्ठ अभिनेत्री वहिदा रहमान यांना Dadasaheb Phalke Award जाहीर
ज्येष्ठ अभिनेत्री वहिदा रहमान यांना दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर झाला आहे. केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकूूर यांनी ही घोषणा केलीय. वहिदा रहमान यांना हिंदी सिनेसृष्टीतील अमूल्य योगदानासाठी हा पुरस्कार जाहीर करण्यात आलाय. वहीदा रहमान आणि देव आनंद यांनी अनेक चित्रपटांमध्ये एकत्र काम केलं. आणि आज नेमकी देव आनंद यांची १००वी जयंती आहे, आणि त्याच दिवशी वहीदा रहमान यांना दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर झाला आहे.